माणसे केवळ बँकेच्या पासबूकतील नोंदी तपासतात आणि जमा खर्चचा हिशेब मांडतात आयुष्यात कशाच्या बदल्यात काय मिळवतो आणि काय गमावत आहोत हे कळतच नाही खरंतर हे बारीक नजरेने तपासायला हवे
आयुष्याच्या पासबूकतील नोंदणी ही तपासायला हव्यात त्याची चिकित्सा करायला हवी लहानपणी मिळालेल्या account मध्ये दिवसेंदिवस किती वाढ झाली का आहे तेवाडीचं राहिली हे जाणून ग्यायला हवे
आपण माणसे digital दुनियेत एवढे हरवून गेलो आहोत की आयुष्यचे पासबुक पहायच विसरून गेलो आहोय त्यात plus किती झाले म्हणजे चांगली माणसे , गोष्टी किती घडल्या पाहताच नाही पण एक नेगटीव्ही गोष्ट घडली की आयुष्यभर त्याचीच चिंता करतो.
“थेंब थेंब तळे साचे” हे तर लहानपणी पासून ऐकत आलो आहोत पण याचा विरोदाभास पण असू शकतो ना की थेंबे थेंब तळेसुद्धा संपू शकते तसेच काही आयुष्याचे आहे छोट्या छोट्या गोष्टी कडे लक्ष नाही दिले तर आयुष्यचे तळे कधी संपेल समजणार पण नाही.
आयुष्याचं पासबुक भरण हे आपल्याच हातात आहे आता ते संपण्याच्या आधी राहिलेली रक्कम छोट्या छोट्या गोष्टी साठवून मोठी करायची की आहे ती रक्कम नको असलेल्या गोष्टी चा विचार करून संपवायची हे आपलं आपण ठरवावं…..😊