
About Book –
आशिष चोप्रा त्यांच्या व्यापक वैयक्तिक अनुभवातून कृतिप्रवण होण्याची अंतर्दृष्टी आणि दर्जेदार परिणामांसाठी विस्तृत रूपरेषा देतात. – नीर एयाल, ‘हूक्ड’ आणि ‘इनडिस्ट्रॅक्टेबल’या बेस्टसेलिंग पुस्तकांचे लेखक आशिष चोप्रा कथाकथन कौशल्यात पारंगत आहे. थोडक्यात सांगायचं तर त्याची कामगिरी व्हायरल होण्यासाठीच तो जन्माला आला आहे. – रमीत अरोरा, सीओओ (डिजिटल बिझनेस), हिंदुस्थान टाइम्स व्हायरल मार्केटिंग ही योगायोगाने घडलेली आनंदाची गोष्ट नसावी. आशिष चोप्रा यांच्या पहिल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे चित्रीकरण जवळजवळ नगण्य खर्चात पार पडले होते आणि यासाठी उपकरणांचा वापरदेखील काटकसरीने करण्यात आला होता. तरीसुद्धा, आज त्यांच्या कंटेंटला 35 कोटींपेक्षा जास्त दर्शक लाभले आहेत. त्यांनी कंटेंट मार्केटिंग हे क्षेत्र काबीज करून त्यावर झेंडा फडकवला, यावर उद्योगक्षेत्रातील दिग्गजांनी शिक्कामोर्तब केले आहे. काही महत्त्वपूर्ण मुद्दे : आशयाच्या सागरात प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे; कंटेंट पाहत असताना लोकांना खिळवून कसे ठेवावे; (कारण दर्शक विकत घेता येतात; पण लोकांना खिळवून ठेवणे मात्र प्रयत्नाने साध्य करावे लागते) कथनकौशल्य हे निर्मिती खर्चावर कशी मात करते; (तसेच निर्मिती प्रक्रियेमध्ये पडद्यामागे घडणाऱ्या घटनांबाबत काही महत्त्वाच्या सूचना आणि युक्त्या) तुमच्या पर्सनल ब्रँडची निर्मिती कशी कराल; (आणि नोकरीची असुरक्षितता कशी संपवाल). अत्यल्प खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, उद्योजकाला, ब्लॉगरला, मार्केटिंग मॅनेजरला किंवा नेतृत्व करू पाहणाऱ्याला, सातत्याने व्हायरल यश कसे मिळवावे, यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे पुस्तक.
व्हायरल मार्केटिंग ही योगायोगाने घडलेली आनंदाची गोष्ट नसावी.
आशिष चोप्रा यांच्या पहिल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे चित्रीकरण जवळजवळ नगण्य खर्चात पार पडले होते आणि यासाठी उपकरणांचा वापरदेखील काटकसरीने करण्यात आला होता. तरीसुद्धा, आज त्यांच्या कंटेंटला 35 कोटींपेक्षा जास्त दर्शक लाभले आहेत. त्यांनी कंटेंट मार्केटिंग हे क्षेत्र काबीज करून त्यावर झेंडा फडकवला, यावर उद्योगक्षेत्रातील दिग्गजांनी शिक्कामोर्तब केले आहे.
काही महत्त्वपूर्ण मुद्दे :
आशयाच्या सागरात प्रेक्षकांचे लक्ष कसे वेधून घ्यावे;
कंटेंट पाहत असताना लोकांना खिळवून कसे ठेवावे;
(कारण दर्शक विकत घेता येतात; पण लोकांना खिळवून ठेवणे मात्र
प्रयत्नाने साध्य करावे लागते)
कथनकौशल्य हे निर्मिती खर्चावर कशी मात करते;
(तसेच निर्मिती प्रक्रियेमध्ये पडद्यामागे घडणाऱ्या घटनांबाबत
काही महत्त्वाच्या सूचना आणि युक्त्या)
तुमच्या पर्सनल ब्रँडची निर्मिती कशी कराल;
(आणि नोकरीची असुरक्षितता कशी संपवाल).
अत्यल्प खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला, उद्योजकाला, ब्लॉगरला, मार्केटिंग मॅनेजरला किंवा नेतृत्व करू पाहणाऱ्याला, सातत्याने व्हायरल यश कसे मिळवावे, यासाठी अचूक मार्गदर्शन करणारे पुस्तक.
‘तुझा व्हिडिओ एनडीटीव्हीच्या होमपेजवर आला आहे!’ माझी बायको फोनवरून ओरडून सांगत होती. ती काय म्हणते आहे याचं मला आकलन होऊन मी तातडीने काय आहे ते ब्राउज करायला जाणार, त्याच्या आधीच दरवाजा ठोठावल्याचा आवाज आला. ‘रेडिओ मिर्चीवाले तुला शोधताहेत,’ माझी सहकारी मला ओरडून सांगत होती. तिच्या बोलण्यातून उत्साह ओसंडून वाहत होता. एखादं गुपित सांगावं, तसा तिचा आविर्भाव होता. रेडिओ मिर्चीवर मुलाखत! मी जो व्हिडिओ काल संध्याकाळी यू ट्यूबवर टाकला होता आणि फेसबुकवर शेअर केला होता तो लोकांना प्रचंड आवडून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. प्रत्यक्ष मी निर्माण केलेल्या या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं यश मी अनुभवत होतो. व्हिडिओमध्ये मी स्वत: असल्याने शहरात मी जिथं जिथं जात होतो तिथं लोक मला ओळखायला लागले होते- ते माझ्याकडे पाहून त्यांच्या गाड्यांमधून हात हलवत होते. कॅफेमध्ये अनोळखी लोक येऊन माझ्याशी हस्तांदोलन करत होते. तुम्ही जर गुगलवर जाऊन ‘गुडगाव टोल सरप्राइज’ असं टाइप केलंत तर तुम्हाला पहिलं पान व्हिडिओ शेअर केल्याच्या लिंकने भरलेले दिसेल.
माझ्या आयुष्यातील हा कालखंड आनंदाचा तर होताच; पण त्याचवेळी घाबरवून टाकणारा, धडकी भरवणाराही होता. अत्युच्च आनंदाचा अशासाठी की त्या लहानशा 15 सेकंदांत मला भरपूर प्रसिद्धी मिळाली होती. रस्त्यांमध्येसुद्धा लोक मला ओळखायला लागले होते; तीन दिवस मी माझे कपडेसुद्धा बदललेले नव्हते! मी जर या संधीचा फायदा घेतला नाही, हा व्हिडिओ का यशस्वी झाला याचा नीट अभ्यास केला नाही, तर मी हे एकच आश्चर्यकारक असं काहीतरी काम केलं, ते लोकप्रिय झालं, एवढंच माझ्या खाती जमा होईल आणि लवकरच मी लोकांच्या मनातून नाहीसा होईन आणि हा विचार मला घाबरवून टाकणारा होता. हे यश काही मला सहजासहजी मिळालं नव्हतं. त्यासाठी मला दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली होती. खूप वाट पाहावी लागली होती. साधारण दशकभर मी अंधारात चाचपडत काम करत होतो. व्यवसाय सुरू करत होतो, बंद करत होतो. व्हिडिओबाबत विविध प्रयोग करून बघत होतो. विक्रीच्या क्षेत्रात काम करण्यापासून ते समाजमाध्यमांवरील खात्यांचे व्यवस्थापन करण्यापर्यंत सर्व प्रकारची कामं करत होतो. माझ्या कारकिर्दीला आता नवी दिशा मिळाली असून बदललेल्या आयुष्याचा हा माझा पहिला दिवस होता याविषयी मला फारशी जाणीव नव्हती.
व्हायरल झालेला व्हिडिओ ही एक आनंदी, अनपेक्षित घटना होती. माझ्यासाठी परिस्थिती अनुकूल होती. भवितव्य उज्ज्वल होतं आणि नशीब जोरावर होतं. व्हायरल व्हिडिओमागच्या धमाल वेडेपणातही एक कार्यपद्धती असते, ती शिकण्याचा माझा प्रवास त्या दिवशी सुरू झाला आणि जसजसा मी ते शिकत गेलो तसतसा त्याविषयीच्या नोंदी माझ्या फोनच्या अॅपवर नोंदवत गेलो. पहिल्या व्हिडिओच्याबाबत माझी जी निरीक्षणं होती ती नीट लक्षात घेऊन त्याचा वापर मी पुढचा व्हिडिओ बनवताना केला आणि तोही व्हायरल झाला. मग मी नवीन व्हिडिओ तयार करताना काही प्रयोग केले आणि हा तिसरा व्हिडिओही व्हायरल झाला. या व्हिडिओला एकदम स्फोट व्हावा तसा प्रतिसाद मिळाल्यामुळे मी आश्चर्यानंदाने थक्क झालो, मला प्रचंड हुरूप आला. वर्ष 2014च्या ऑगस्टमध्ये मी जो व्हिडिओ केला तो 70 लाख लोकांनी पाहिला. साडेतीन लाख जणांनी तो शेअर केला. भारतात फेसबुक इंटरनेट वापरणाऱ्या 25 टक्के लोकांपर्यंत तो पोहोचला. हाच व्हिडिओ आशियातील सर्वांत जास्त शेअर केलेला व्हिडिओ ‘ब्रँडेड फेसबुक पोस्ट’ ठरला आणि अनेक पुरस्कार मिळवत राहिला.
About the Author
ज्यांनी तयार केलेले व्हिडिओ व्हायरल होणारच अशी ख्याती असलेले, त्यासाठी अनेक पुरस्कार पटकावलेले आशिष चोप्रा हे ‘फास्ट चीप अॅण्ड व्हायरल’ या पुस्तकाचे लेखक आहेत. त्यांनी निर्मिती आणि विक्री केलेले व्हिडिओ लाखोजणांनी शेअर केले आणि प्रचंड प्रमाणावर लोकांनी ते पाहिले आहेत. त्यांच्या व्हिडिओज्ना 350 दशलक्ष (35 कोटी) दर्शक लाभले आहेत. विशेष म्हणजे त्यातील एका व्हिडिओला ‘ब्रँडेड फेसबुक पोस्ट’ (आशियातील सर्वांत जास्त शेअर केली गेलेली पोस्ट) हा मान मिळाला आहे, तर त्यांचा दुसरा एक व्हिडिओ केवळ आठवड्याभरात 40 दशलक्ष (चार कोटी) लोकांनी पाहिला. व्हायरल व्हिडिओ मार्केटिंग या विषयावरील व्याख्याता म्हणून त्यांना प्रचंड मागणी असून फोर्ब्जच्या यादीत झळकण्याचा बहुमान त्यांच्या नावावर जमा आहे. सध्या ते इक्सिगो कंपनीत कंटेंट मार्केटिंगचे प्रमुख म्हणून काम पाहतात.
Book review –
फास्ट चीप ॲण्ड व्हायरल’
आशिष चोप्रा यांनी लिहलेले ये पुस्तक 21st मध्ये खूप महत्त्वाचे आहे. जर आपण मार्केटिंग आणि ब्रँडिंग या फील्ड मध्ये असाल तर न चुकता ये पुस्तक वाचा.
हे पुस्तक बेसिकाली सर्व सामान्य लोकांनासाठी लिहिलं आहे. जाच्याकडे मार्केटिंग साठी खूप कमी गोष्टी उपलब्ध असतात त्यांनी त्याचा वापर कसा करावा. कमीत कमी वेळ मध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसे पोहचावे ये खूप उत्तम पने लिहिले आहे.
मी स्वतः कन्टेन्ट मार्केटिंग आणि युट्यूबर आहे त्यामुळे ह्यातल्या खूप साऱ्या गोष्टी कश्या वापरायच्या याची आयडिया आली.
पुस्तकामध्ये खूप साऱ्या गोष्टी ग्राफ ने समजावल्या आहेत त्यामुळे परफेक्ट knowledge भेटते.
जेव्हा तुम्ही मार्केटींग करता त्यावेळी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते उत्कृष्ट पणे सांगितले आहे. (इतरांना मदत करू शकता, असा विचार करा व्हायरल चा विचार करू नका)
तुमचे स्पर्धक काय करतात यावर फोकस करणे थांबावा
असेच खूप सारे lessons ह्या पुस्तक मध्ये आहेत.
नवीन काही शिकायची ईच्छा असेल तर एकदा ये पुस्तक नक्की वाचा.
Buy book here –
<a href="https://www.amazon.in/Fast-Cheap-Viral-Game-Changing-Shoestring/dp/9352203186?keywords=fast+cheap+and+viral+marathi&qid=1636723894&s=books&sr=1-1&linkCode=li1&tag=ronakblog-21&linkId=b64b08e9ead9c6f7cb68f138aaa59ef9&language=en_IN&ref_=as_li_ss_il" target="_blank"><img border="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?_encoding=UTF8&ASIN=9352203186&Format=_SL110_&ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=ronakblog-21&language=en_IN" ></a><img src="https://ir-in.amazon-adsystem.com/e/ir?t=ronakblog-21&language=en_IN&l=li1&o=31&a=9352203186" width="1" height="1" border="0" alt="" style="border:none !important; margin:0px !important;" />